In order to fulfill the basic functions of our service, the user hereby agrees to allow Xiaomi to collect, process and use personal information which shall include but not be limited to written threads, pictures, comments, replies in the Mi Community, and relevant data types listed in Xiaomi's Private Policy. By selecting "Agree", you agree to Xiaomi's Private Policy and Content Policy .
Agree

मराठी

[इतर] मकरसंक्रांती शुभेच्छांसह, Mi कमुनिटी मराठी फोरम वर्षपुर्ती!

2020-01-14 21:45:51
71 1

नमस्कार सर्वांना, मकरसंक्रांती सणाच्या हार्दिक शुभेच्छा!!! तिळगुळ घ्या गोड गोड बोला !!
मकरसंक्रांत हा भारतीय पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा शेती संबंधित सण. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण इंग्रजी जानेवारी महिन्यात असतो. कृषीप्रधान भारतीय संस्कृतीत या दिवसांमध्ये शेतांत, मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवास अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. मकरसंक्रांतीला महाराष्ट्रात संक्रांत असे म्हणतात.

भौगोलिक संदर्भ: दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडे२३ दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीचे वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीत संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडे२३ दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंक्रमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. या सणाची तारीख बदलत राहिली.मकरसंक्रांती दिनी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.

भोगी: हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात.भोगी हा उप-भोगाचा सण होय असे मानले जाते. या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी ३ दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात. त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. या दिवशी उप-भोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते.

प्रादेशिक विविधता: संक्रात भारताच्या विविध प्रांतांत उत्साहाने साजरी केली जाते. उतर भारतात,हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी, (Lohari)पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohari)पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहरी सण साजरा केला जातो. संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात व शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ, तीळ टाकतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवसांपैकी एक असतो. या दिवशी लोहरीदेवीची पूजा करतात.पूर्व भारतात,बिहार - संक्रान्ति आसाम - भोगाली बिहू, पश्चिम बंगाल - मकर संक्रान्ति ओरिसा - मकर संक्रान्ति पश्चिम भारतात, गुजरात व राजस्थान - उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण) गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरी यांच्या खिचड्या बनवल्या जातात. गुजराथमध्ये मकरसंक्रांतीचा दिवस उतरायण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजराथला भेट देतात.पतंग उडवण्याची ही प्रथा आता सर्वच प्रांतात रूजली आहे, उत्तरायणाच्या उबदार सुर्यप्रकाशात थंडी घालवण्यासाठीचाच तर हा प्रयत्न नसेल ना?

दक्षिण भारतात,कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)तमिळनाडू - पोंगल, (Pongal)दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गूळ, दूध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात. मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.तर असा हा बहुप्रांती बहुढंगी नानारित्या साजरा होणारा पण एकात्म दर्शन घडविणारा सण. नवीन वर्षातला प्रथम सण, या सणाच्या सर्व शाओमी चाहत्यांना मंगलमय शुभेच्छा

आपण हा दिवस कसा साजरा करता? आम्हास खालील प्रत्युत्तरांत जरूर कळवा

मराठी सबफोरम फ़ॉलो करा येथे क्लिक करून व अपडेटस्शी सुसंगत रहा

2020-01-14 21:45:51
Favorites RateRate

Spam Hunter

parag purkar | from MIX

#1

मकरसंक्रांति पर्वाच्या सर्वांस मंगल शुभेच्छा
2020-01-15 09:21:18
please sign in to reply.
Sign In Sign Up

Dattatray Masurkar

Master Bunny

  • Followers

    31

  • Threads

    67

  • Replies

    240

  • Points

    5907

3 Days Check-In
7 Days Check-In
21 Days Check-In
40 Days Check-In
70 Days Check-In
Shake!!Shake!!
Lucky Draw No.
500K Members
2016 Christmas
Mi Explorers
App Review
1 million members
Xiaomi 7th Birthday
1st Anniversary
71st Independence Day
2 million registered members
Diwali
2018 New Year Medal
Mi Community Updater
Color Your Planet
MIUI 10
MIUI 8th Anniversary
10 Million Downloads
2019
Throwback With Mi 2018
9 Years of MIUI
Mi-stery Box Game
2020
We Help!
#AnswerMi Vol 1

Read moreGet new
Copyright©2010-2020 Xiaomi.com, All Rights Reserved
Content Policy
Quick Reply To Top Return to the list