In order to fulfill the basic functions of our service, the user hereby agrees to allow Xiaomi to collect, process and use personal information which shall include but not be limited to written threads, pictures, comments, replies in the Mi Community, and relevant data types listed in Xiaomi's Private Policy. By selecting "Agree", you agree to Xiaomi's Private Policy and Content Policy .
Agree

मराठी

[चर्चा] कथा शाओमीची: गाथा क्रमांक 1 बनण्याची

2020-01-17 05:17:37
160 4

चहाते असल्याने आपल्या आवडीच्या ब्रॅण्डबद्दल, आणीक काय नवे हे जाणून घेण्यास आपण आतूर आणि उत्सुक असतो. तुर्त येथे आपण सर्व शाओमी फॅन्स असलो तरी २०१४ मध्ये भारतातील तंत्रज्ञान उद्योगात आलेल्या, पाहिले आणि जिंकलेल्या आणि २०२० मध्येही शाओमीच निर्विवाद अव्वल आहे, तर अशा या ब्रँडबाबत आपल्यातील फक्त काहीच लोकांना संपुर्ण माहिती आहे. कट्टर Mi फॅन असल्याने, सुरुवातीपासूनच ब्रँडशी कनेक्ट असल्याने विशेषाधिकाराने आज तुम्हाला शाओमीच्या क्र. 1 होण्याची गाथा सांगतो:

आणि यासह, आम्ही एक विशेष मालिकाच चालवणार आहोत - "कथा शाओमीची", स्मार्टफोन, इकोसिस्टम आणि अॅक्सेसरीजसह सर्व शाओमी उत्पादनांचा संक्षेप, जे आजपर्यंत भारतात दाखल झाले आणि त्यांनी भारताच्या तंत्र उद्योगात कसे वादळ आणले, त्यास निराळा आकार दिला?

एक द्रुत परिचय
फक्त 10 वर्षात, शाओमीने आपला व्यवसाय जगभरात विस्तारित केला आणि आपल्या आश्चर्यकारक आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांनी लाखो वापरकर्त्यांची मने जिंकली. खरं म्हणजे, भारतात, शाओमीने आपला पाय नाट्यमयरित्या पसरविला आणि Q3 2017 पासून देशातला हा नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड आहे. आज, शाओमी केवळ #1 स्मार्टफोन ब्रँड नाही तर IoT (इंटरनेट ऑफ थिंग्स) आणि फिटनेस ब्रँड प्रकारातही समान यश मिळवलेय. शाओमीबद्दल बरेच काही सांगायचेय, उदा: त्याची सुरुवात, यशोगाथा, त्यांनी लाखो लोकांची मने कशी जिंकली. किंवा थोडक्यात आम्ही "कथा शाओमीची" असेही म्हणू शकतो.

6 एप्रिल 2010 रोजी, शाओमीची लेई-जून (माजी किंग्सॉफ्ट सीईओ), लिन बिन, डॉ झोऊ ग्वांगपिंग, लिऊ डी, ली वानकियांग, वोंग कॉंग-कॅट आणि हाँग फेंग यांनी सह-स्थापना केली. शाओमी हा सध्या जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड आहे आणि त्याने जगातील सर्वात मोठे ग्राहकसंख्येचे IoT प्लॅटफॉर्म स्थापित केले आहे ज्यामध्ये 213.2 दशलक्षहून अधिक स्मार्ट उपकरण (स्मार्टफोन आणि लॅपटॉप वगळता) कनेक्ट आहेत.

जगभरचा प्रवास - एक टाइमलाइन
प्रतिमा स्त्रोत

गेल्या 10 वर्षात, शाओमीने बर्‍याच देशांमध्ये विस्तार केला आणि जगभरात अपराजित यश संपादन केले. सध्या, शाओमी उत्पादने जगभरातील 30+ पेक्षा जास्त देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये आहेत आणि बर्‍याच बाजारामध्ये उंचावर पाय रोवून आहे.

तारीखदेश
फेब्रुवारी 2014शाओमीने चीनबाहेर सिंगापूरमध्ये आपला पहिला विस्तार जाहीर केला.
मार्च 2014शाओमी स्टोर ऑस्ट्रेलियाने (एक असंबंधित व्यवसाय) आपल्या XiaomiStore.com.au वेबसाइटवरून ऑस्ट्रेलियामध्ये शाओमी मोबाईलची ऑनलाइन विक्रीस  सुरुवात केली.
जुलै 2014शाओमीने भारतात Mi3 लाँच केला
जून 2015शाओमीने ब्राझीलमध्ये विस्तार करण्याची घोषणा केली
ऑगस्ट २०१६शाओमीने सोलर इलेक्ट्रो बांग्लादेश लिमिटेड मार्गे बांग्लादेशात प्रवेश केला
फेब्रुवारी 2017शाओमीने अधिकृतपणे पाकिस्तानमध्ये लॉन्च केले
नोव्हेंबर 2017शाओमीने स्पेनमध्ये काम करण्यास सुरवात केली
फेब्रुवारी 2018शाओमीने फिलिपिन्समध्ये पहिले मी स्टोअर उघडले
मे 2018शाओमी पॅरिसमध्ये त्याचे पहिले फ्रेंच स्टोअर उघडले
शाओमीची त्रैमासिक 3 ची कमाई
प्रतिमा स्त्रोत

टेकक्रंचच्या मते सप्टेंबर २०१९ अंतीच्या तिमाहीत, चीनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने 53.7 अब्ज युआन वा $7.65 अब्ज डॉलर्सची कमाई केली असून दुस-या तिमाहीतील 51.95 अब्ज युआन ($ 7.39अब्ज डॉलर्स) पेक्षा ३.३% वाढ झाली असून तिमाहीच्या आकडेवारीनुसार २०१८ पासून तब्बल 5.5 वाढ झाली आहे.

शाओमी इंडियाची सफलता गाथा

जेव्हा शाओमीने फ्लिपकार्टला क्रॅश केले

जुलै २०१४ मध्ये, शाओमीने फ्लिपकार्टच्या सहकार्याने भारतातील आपला पहिला स्मार्टफोन Mi 3 लॉन्च केला. Mi 3 'फ्लॅश सेल' चालू होताच हा स्मार्टफोन मिळवण्याचे प्रयत्नांत फ्लिपकार्ट वेबसाइटवर 500,000 हून अधिक वापरकर्ते लॉग इन झाले. सामान्य रहदारीपेक्षा हे प्रमाण चार पट जास्त होते. एकाच वेळी वेबसाइट ब्राउझ करणार्‍या अभ्यागतांच्या प्रचंड गर्दीमुळे फ्लिपकार्टच्या सर्व्हर्सवर परिणाम झाला आणि साइट काही मिनिटांसाठी निष्काम झाली.
प्रतिमा स्त्रोत

वापरकर्त्यांनी आपली निराशा सोशल मीडिया चॅनेल्सवर रोखली. अग्निजन्य पार्श्वभूमीवर, अभियांत्रिकी चमू कृतीत आल्या, साइट परत उभारणीसाठी अथक कार्य केले गेले. ही अभूतपूर्व ऑनलाइन चेंगराचेंगरी कशामुळे झाली? तर नव्याने लॉन्च शाओमी Mi 3 स्मार्टफोनची फ्लॅश विक्री.
प्रतिमा स्त्रोत

क्रमांक 1 चे पद
प्रतिमा स्त्रोत
2014 नंतर, शाओमीने भारतात उत्पादनांची मालिकाच सुरू केली आणि विश्वास राखा, प्रत्येक उत्पादन स्वत:तच अविश्वसनीय असल्याने लाखो लोकांची मने जिंकत गेलेय.  नोव्हेंबर 2017, शाओमी इंडियासाठी त्यांचे यशाचा सर्वात मोठा क्षण होता. अंदाज लावा, ते काय होते? सर्व Mi चाहत्यांसाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता. आयडीसीच्या ताज्या तिमाही स्मार्टफोन ट्रॅकर, 2017 नुसार बाजारातील वाटा 23.5% आणि 9.2 दशलक्ष स्मार्टफोन विक्रीसह, शाओमी शिडी चढत भारताचा नंबर एकचा स्मार्टफोन ब्रांड बनला.

या क्वार्टर3 2017 पासून आतापर्यंत कोणीही शाओमी इंडियाला नंबर 1 स्मार्टफोन, नंबर 1 स्मार्ट टीव्ही, क्रमांक 1 वेअरेबल ब्रँड, नंबर 3 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म व क्रमांक 1 सिंगल-ब्रँड रिटेल अस्तित्वाच्या स्थानावरून खाली आणण्यात सक्षम ठरलेले नाही.

मी कमुनिटी शाओमी समुह - शाओमीतर्फेचा मंच
प्रतिमा स्त्रोत
Mi कम्युनिटी इंडिया - एक संवादात्मक मंच - जून २०१६  मध्ये १०० क्लोज-बीटा सदस्यांसह अधिकृतपणे जाहीर केला गेला. Mi कम्युनिटी आता जगभरातील 18 बाजारात उपलब्ध आहे आणि स्थानीक Mi फॅनच्या अपेक्षांना जोडण्यासाठी आणि समजण्यासाठी प्रत्येक समुह स्वतःच्या बोलीभाषेत चालतो! हे गंभीरपणे महत्वाचे आहे, जेव्हा कंपनीकडे चाहत्यांचा विश्वास असतो "फक्तचाहत्यांस्तव"   म्हणूनच आतापर्यंत, Mi कम्युनिटी इंडियाचे 11,084,951 सदस्य आहेत आणि प्रत्येक दिवस हे वाढतच आहेत.
"फक्त चाहत्यांसाठी" - हा आमचा विश्वास आहे. आमचे निस्सिम Mi चाहते सर्व मार्गांवर आघाडी करतात. - शाओमी

शाओमीबरोबर मजा करा
प्रतिमा स्त्रोत

नेहमीच विश्वास ठेवा की काहीतरी आश्चर्यकारक असे घडेल-  लेई जून

शाओमी नेहमी त्यांचे चाहत्यांचे ऐकते, त्यांना आनंदि आणि उत्साही ठेवते. शाओमी इंडियाने Mi पॉप हा देशभरातील Mi चाहत्यांसाठी खास मजेने भरलेला कार्यक्रम आयोजित केला. पहिला Mi पॉप vR कार्यक्रम मुंबईत डिसेंबर २०१६  मध्ये, Mi पॉप प्ले मे २०१८ मध्ये Mi दिल्ली येथे तर में २०१९ सालीही दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम नेहमीच चाहत्यांने भरदच्च व बर्‍याच मजेदार खेळ, अनेक भाग्यवंत बक्षिसे, शाओमीच्या कर्मचार्‍यांद्वारे सादरीकरण, विशेष पाहुणे आणि बरेच काही असल्याने अविस्मरणीय असतो. Mi चाहत्यांनी Mi पॉपचा किती आनंद लुटला ते खालील चित्रफितींत पहा.

Mi पॉप व्हीआर
Mi पॉप प्ले
Mi पॉप 2019
Mi फॅन - शाओमीचे वास्तविक तारे
प्रतिमा स्त्रोत

Mi कम्युनिटीचे अनेक डायहार्ड-Mi फॅन्स आहेत ज्यांना विविधरूपात जसे घोषणा, भिन्न हॅक्स, स्पर्धा चालविणे आणि बरेच काही सामायिक करून समुहात हातभार लावण्यावर विश्वास आहे. रेडमी के २० सीरिजच्या लॉन्च इव्हेंटच्या दरम्यान, शाओमी इंडियाने निवडक २० (पूर्वीचे) Mi चाहत्यांची निवड केली आणि या आकाशगंगेचे वास्तविक तारे म्हणून गौरवीले. यापैकी कित्येक आता शाओमी इंडियाचे अधिकृत कर्मचारी आहेत, जी Mi फॅन म्हणून भरीव कामगिरी आहे.
आमचे हार्डकोर Mi चाहते सर्व मार्गांवर आघाडी करतात. खरं तर, शाओमीचे बरेच कर्मचारी संघात येण्यापूर्वी प्रथम Mi चाहते होते. एक संघ म्हणून, आम्ही परिपूर्णतेचा समान अथक प्रयत्न सामायिक करतो, शक्यतो सर्वोत्कृष्ट वापरकर्ता अनुभव तयार करण्यासाठी आमच्या उत्पादनांना सतत परिष्कृत आणि वर्धित करतो. - शाओमी

आज अधिकृत कर्मचारी बनलेले Mi चहाते काय म्हणतायत:
  • रोहित घळसासी

  • सुदीप साहू

  • शेख निसार अहमद

  • संगत देसाई


ही होती प्रारंभिक "कथा शाओमीची". आणी आतापर्यंत भारतात सुरू वेगवेगळ्या उत्पादनांसह ही गाथा सुरूच आहे.


2020-01-17 05:17:37
Favorites1 RateRate

Advanced Bunny

1673402270nw | from Redmi 3S

#1

उत्तम प्रवास
2020-01-17 08:53:44

Master Bunny

Dattatray Masurkar | from Redmi 7

#2

खरंच अंगावर शहारे आणणारी कहाणी आहे शाओमीची आणि सफलता आपोआप मिळत नसते ती मिळवण्यासाठी जिवापाड मेहनत पण घ्यावी लागते हे शिकण्याची
2020-01-17 09:08:30

Semi Pro Bunny

1686386599sad | from Redmi K20

#3

congrats Xiaomi
2020-01-26 07:17:57

Semi Pro Bunny

1719544986ng | from Redmi 5A

#4

उत्तम माहिती
2020-02-03 00:18:40
please sign in to reply.
Sign In Sign Up

parag purkar

Spam Hunter

  • Followers

    262

  • Threads

    508

  • Replies

    1535

  • Points

    62671

APP scratch card
6th MIUI
Mi Max
Power At Last
Photography
100 threads in a Month
300K Members
Go Smash!
3 Days Check-In
7 Days Check-In
21 Days Check-In
40 Days Check-In
70 Days Check-In
100 Days Check-In
1 Year Check-In
Shake!!Shake!!
Lucky Draw No.
500K Members
Christmas Contest
2016 Christmas
Mi Explorers
2016 #ThrowbackwithMiComm
App Review
1 million members
Xiaomi 7th Birthday
June-100 replies in a month
July-100 replies in a month
Aug-100 replies in a month
Sep-100 replies in a month
Oct-100 replies in a month
Nov-100 replies in a month
Dec-100 replies in a month
100 ответов в декабре
1st Anniversary
71st Independence Day
My Poster My Life
MIUI 7th Anniversary
2 million registered members
Newbie Member
Diwali
Mi Apps
2018 New Year Medal
ThrowBackWithMiCommunity
2017 Xiaomi Annual Bill
Mi Community Updater
Spam Hunter
Color Our Planet Game
The Motivator
MIUI 10
Golden Mi Bunny
MIUI Subscriber
MIUI 8th Anniversary
Go Bunny Master
Eid Mubarak
5 Million Registered Users
Ringtones Mania
10 Million Downloads
Message in a bottle
2019
Throwback With Mi 2018
Xiaomi's 9th Birthday
9 Years of MIUI
MIUI 11
Dark Mode
Mi-stery Box Game
Motivator
2020
We Help!
Mi Goodwill
#AnswerMi Vol 1

Read moreGet new
Copyright©2010-2020 Xiaomi.com, All Rights Reserved
Content Policy
Quick Reply To Top Return to the list